डॉ. अशोक बोलडे यांची बदली; डॉ. फुले नव्या जिल्हा शल्य चिकित्सक 

रत्नागिरी:- जिल्ह्यात वादग्रस्त ठरलेले जिल्हा शल्यचिकित्सक अशोक बोलडे यांची सोलापूर येथे बदली झाली असून आता जिल्हा शल्यचिकित्सक पदावर डॉ संघमित्रा फुले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

डॉ बोलडे यांची विनंतीनुसार बदली झाली आहे. त्यांच्यावर जिल्हाधिकारी यांनी काही आरोप ठेवले होते. मागील काही दिवसांपासून ते रजेवर होते मात्र कामावर पुन्हा रुजू झाल्यावर देखील त्यांना चार्ज देण्यात आला नव्हता. आता त्यांची बदली झाल्याने या वादावर पडदा पडण्याची शक्यता आहे.