डेरवण येथे फ्लॅट फोडून दागिन्यांची चोरी

रत्नागिरी:- चिपळूण तालुक्यातील डेरवण येथे फ्लॅट फोडून अज्ञात चोरट्याने घरातील दागिने लांबवले. चोरीची ही घटना 5 फेब्रुवारी ते 7 फेब्रुवारी दरम्यान घडली. याबाबतची फिर्याद सचिन गजानन धुमाळ (39, डेरवण हॉस्पिटल रोड, चिपळूण, जांबुर्डे, मुळ गवळीवाडी, मोरवंडे, खेड) यांनी सावर्डे पोलीस ठाण्यात दिली.  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन धुमाळ हे वालावलकर हॉस्पिटल डेरवण येथे मेडिकल सोशल वर्पर म्हणून कामाला आहे. 5 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास हॉस्पिटलच्या कामानिमित्ताने ते फ्लॅट बंद करुन महाड येथे गेले होते. 7 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास अज्ञाताने धुमाळ यांच्या फ्लॅटचे मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून बेडरुममधील कपाटातील सोन्याचे दागिने लंपास केले. दागिने कोणते, किती याचा तपशिल पोलीसांनी दिलेला नाही. याबाबतची फिर्याद सचिन धुमाळ यांनी सावर्डे पोलीस ठाण्यात दिल्यानंतर पोलिसांनी अज्ञातावर भादविकलम 454, 457, 380 नुसार गुन्हा दाखल केला. अधिक तपास पोलीस करत आहेत.