डी मार्ट समोर उभ्या कारला अज्ञात वाहनाची धडक

रत्नागिरी:- शहरानजीकच्या डी-मार्टच्या पुढील रस्त्यावर पार्क केलेल्या कारला अज्ञात वाहनाने पाठीमागून धडक देत अपघात केला. याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

याप्रकरणी फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार,सोमवार 18 सप्टेंबर रोजी ते आपल्या ताब्यातील टाटा टिगोर कार (एमएच-07-एजी-6881) ने ओरोस सिंधुदुर्ग येथून निघून रत्नागिरीत आले होते.दुपारी. 12.30 वा.रत्नागिरी डीमार्ट येथे खरेदी करण्यासाठी जाताना त्यांनी आपली कार डीमार्टच्या पुढील बाजुस पार्क करुन ठेवली होती.खरेदी करुन बाहेर आल्यावर त्यांना आपल्या कारला पाठीमागे उजव्या बाज्ाुला अज्ञात वाहनाची धडक बसून नुकसान झालेले दिसून आले.याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात भादंवि कायदा कलम 279
मोटार वाहन कायदा कलम 184,134,177 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.