रत्नागिरी:- रत्नागिरी शहरानजिकच्या मिरजोळे येथे ट्रकची धडक बसल्याने इलेक्ट्रिक पोल चालत्या दुचाकीवर पडून तरुण गंभीर जखमी झाला.ही घटना शुक्रवार 24 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वा. घडली.
गणेश विष्णू खातू (40,रा.वांद्री संगमेश्वर, रत्नागिरी ) असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी मित्राच्या दुचाकीवर मागे बसून गणेश खातू जे. के. फाईल्स ते ओमेगा कंपनीत जात होता. त्याच सुमारास जिलानी कंपनी समोर एक ट्रक रिव्हर्स घेत असताना त्याची धडक इलेक्ट्रिक पोलला बसली. त्यामुळे विजेचा पोल दुचाकीवरून जात असलेल्या गणेश खातू यांच्या डोक्यावर पडून ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करून अधिक उपचारांसाठी कोल्हापूर येथे नेण्यात आले. याप्रकरणी अधिक तपास ग्रामीण पोलीस करत आहेत.