टेंभ्येत दोन गटात राडा; परस्पर विरोधी गुन्हे दाखल

रत्नागिरी:- तालुक्यातील टेंभ्ये कुजबीवाडी येथे जमिन जागेच्या वादातून दोन कुटुंबात वाद होउन एकमेकांना दगड,लाकडी बांबू तसेच हातांनी मारहाण करण्यात आली.याप्रकरणी परस्परविरोधी तक्रार देण्यात आली असून ग्रामीण पोलिस पोलिस ठाण्यात १३ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही घटना शुक्रवार १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७.३० वा.सुमारास घडली आहे.

सागर नागवेकर, अनिकेत नागवेकर, सुहास नागेवकर, विजय नागेवकर, समिर नागवेकर, कांचन नागवेकर, कृष्णकांत नागवेकर, दिवाकर नागवेकर, हर्षद नागवेकर, सायली नागवेकर, आशिष पाटील आणि दोन अज्ञात अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नाव आहेत. संशयितांमध्ये जमिन जागेच्या हिस्स्यावरुन वाद सुरु असून यातूनच शुक्रवारी सायंकाळी त्यांनी एकमेकांना शिवीगाळ करत दगड,लाकडी बांबू आणि हाताच्या थापटांनी मारहाण केली.याप्रकरणी अधिक तपास ग्रामीण पोलिस करत आहेत.