रत्नागिरी:- गवळीवाडा-संमित्रनगर दरम्यान असणार्या रत्नागिरी नगर परिषदेच्या टीसीएम शाळा क्र.11 च्या बांधकामाचा वाद न्यायालयात गेला आहे. त्यामुळे या शाळा इमारतीसाठी मंजूर झालेला सुमारे 70 लाखांचा निधी कोणत्या शाळेवर खर्च करायचा हा प्रश्न निर्माण झाला आहे. बाजारपेठ चर्चरोड येथील बंद पडलेल्या शाळा क्र.14 ची नवीन इमारत बांधायची की निवखोलातील शाळेच्या वर्गखोल्या बांधायच्या यावर विचार विनिमय सुरू झाला आहे.
रत्नागिरी नगर परिषदेच्या टीसीएम शाळेची इमारत जीर्ण झाल्याने ती शाळा सुमारे 6 वर्षांपूर्वी बंद झाली. चर्चरोड येथील शाळा क्र.14 बंद होवून खूप वर्षे झाली. या दोन्ही शाळांमधील विद्यार्थी पोलिस मुख्यालय वसाहतीतील शाळा क्र.12 मध्ये स्थलांतरीत करण्यात आले. आता पोलिस मुख्यालय आवारातील पोलिस वसाहतीच्या इमारतींचे बांधकाम प्रस्तावित आहे. त्यामुळे ही शाळासुद्धा बंद होण्याच्या मार्गावर आहे. अशावेळी या तिन्ही शाळांच्या आजूबाजूच्या परिसरातील गरीब गरजू विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये यासाठी स्थानिक माजी नगरसेवक निमेश नायर यांनी टीसीएम शाळेची पुर्नबांधणी करण्यासााठी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे निधीीची मागणी केली.
पालकमंत्री उदय सामंत यांनी टीसीएम शााळेच्या नवीन इमारतीसाठी 70 लाख रुपये उपलब्ध करून दिले. त्यानंतर येथील शाळा इमाारत बांधण्यासाठी जुन्या शाळेच्या इमारतीचे तोडकाम सुरू केले. दि. 5 मे रोजी हे तोडकाम सुरू असताानाच कोल्हापूर चर्च कौन्सिल संस्थेच्या प्रॉपर्टी एजंटने आक्षेप घेतला. त्यानंतर कोल्हापूर चर्च कौन्सिलने दिवाणी न्यायालयाात धाव घेतली. निकाल लागेपर्यत रत्नागिरी नगर परिषदेने शाळेची जागा ताब्यात घेवू नये, अशी न्यायालयाकडून ताकीद मिळावी, अशी विनंती करण्यात आली आहे.
टीसीएम शाळा 1974 साली जिल्हा परिषदेकडून रत्नागिरी नगर परिषदेकडे हस्तांतरीत झाली. या शाळेच्यया मालकीबाबत ख्रिश्चन अल्पसंख्यांक विकास सेवा संस्था आणि कोल्हापूर चर्च कौंन्सिलमध्येही कायदेशीर वाद आहेत. या दोन्ही संस्थांनी या मालमत्तेवर आपली मालकी सांगितली आहे. दोन्ही संस्थांकडून यासंदर्भात रत्नागिरी नगर परिषदेने कागदपत्रे मागवली असल्याबाबत जिल्हाधिकार्यांना अहवाल देण्यात आला आहे.