टीआरपी येथे भरधाव ट्रॅक्टरची दोन वाहनांना धडक

रत्नागिरी:- टीआरपी येथे जेके फाईलनजीक भरधाव ट्रॅक्टरने दोन वाहनांना धडक दिली. यात एका छोटा हत्ती आणि टेम्पो रिक्षाचा समावेश आहे. शुक्रवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. यात टेंपो रिक्षाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून काहीजण जखमी झाले आहेत. ट्रॅक्टर चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. अपघातानंतर येथे वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणली.