रत्नागिरी:- नारळाच्या झाडावर चढून माडी काढत असताना तोल जाऊन पडलेल्या वृद्धाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते.
तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. नाटे सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. नितीन काशीराम नार्वेकर (वय ४९, रा. कोंबे, पो. आडीवरे, ता. राजापूर) असे मृताचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (ता. १०) घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार नितीन नार्वेकर हे स्वतःच्या मालकीच्या माडाच्या झाडावर माडी काढण्यासाठी चढले होते अचानक त्यांचा तोल जाऊन पडले. कशेळी येथील खासगी दवाखान्यात नेण्यात आले होते. अधिक उपचारासाठी रत्नागिरीतील खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.