झाडगाव येथील तरुणाची गळफास घेत आत्महत्या

रत्नागिरी:- शहरातील झाडगाव येथे तरुणाने अज्ञात कारणातून घराच्या मागील बाजूच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. स्वप्नील दीपक तावडे (वय ३८, रा. झाडगाव, रत्नागिरी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

सदर घटना गुरुवारी (ता. १५) सकाळी साडेआठच्या सुमारास निदर्शनास आली. स्वप्नील बुधवारी (ता. १४) दुपारी साडेबारा वाजता घरातून काही कामानिमित्त बाहेर निघून गेला होता. असा एक-दोन दिवस कामानिमित्त घराबाहेर नेहमी जात असल्याने त्याच्या नातेवाईकांनी त्याचा कुठेही शोध घेतला नाही. मात्र घराच्या मागील बाजूच्या खोलीत स्वप्नील गळफास घेतलेल्या स्थितीत आढळला. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे. स्वप्नीलने टोकाचे पाऊल का उचलले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.