रत्नागिरी:- रत्नागिरीतील जोशी कुटुंबाकडून फणसोप गावातील लक्ष्मी केशव मंदिरासाठी एक लाखांच्या देणगीचा धनादेश नुकताच मंदिर समितीकडे सुपूर्द करण्यात आला. शहीद जवान कै. प्रदीप मनोहरराव जोशी यांच्या स्मरणार्थ ही देणगी देण्यात आली.
प्रदीप जोशी यांचे ज्येष्ठ पुत्र महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा शाखा रत्नागिरीचे प्रसिद्ध प्रमुख श्री. पंकज जोशी सर यांनी हा धनादेश मंदिर समितीकडे सुपूर्द केला. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष माननीय कमलाकर साळवी, सचिव राकेश साळवी, तसेच खजिनदार नवीन साळवी उपस्थित होते. यावेळी पंकज जोशी यांच्या मातोश्री व पांचाळ सर, आणि भांडवले सर हेदेखील उपस्थित होते. ट्रस्टचे अध्यक्ष माननीय कमलाकर साळवी यांनी शाल श्रीफळ देऊन जोशी कुटुंबाचा सन्मान केला व त्यांना शुभेच्छा दिल्या.