जे.के.फाईल्सजवळ दुचाकी घसरुन अपघात; दोघे जखमी

रत्नागिरी:- दुचाकीसमोर कुत्रा आडवा आला म्हणून ब्रेक लावल्याने दुचाकी घसरुन अपघात झाला. यात दुचाकीवरील दोघे जखमी झाले असून ही घटना शुक्रवारी दुपारी 3 वा.सुमारास रत्नागिरीतील जे.के.फाईल्स बसस्टॉप पुढे घडली.अपघाताची नोंद शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

ॠषीकेश राजेंद्र पवार (35, रा. हुनमाननगर,मिरजोळे रत्नागिरी) आणि त्याची आई या अपघातात जखमी झाले आहेत. शुक्रवारी दुपारी पवार आपल्या ताब्यातील दुचाकी (एमएच- 08-एबी- 6125) वरुन सोबत आईला घेउन घरी जात होते.ते जे. के. फाईल्स बसस्टॉप पुढे आले असता त्यांच्या दुचाकीसमोर7 अचानकपणे एक कुत्रा आडवा आल्याने त्यांनी ब्रेक लावला असता ती घसरल्याने ते रस्त्याच्या साईडला पडून अपघात झाला.याप्रकरणी अधिक तपास पोलिस नाईक नितीन जाधव करत आहेत.