जुगाराचे साहित्य घेऊन जाणारी गाडी पकडली; 15 लाखांचा मुद्देमाल जप्त

देवरूख:- जुगाराचे साहित्य वाहून नेणारी गाडी देवरूख पोलीसांनी रविवारी सकाळी 9.30 वाजता देवरूख- साखरपा मार्गावरील मार्लेश्वर फाटा येथे पकडली आहे. जुगाराचे साहित्य, इनोव्हा गाडी असा एकूण 15 लाख 38 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी चार जणांवर देवरूख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सज्ज आहे. खबरदारी म्हणून महत्वाच्याचल नाक्यांवर वाहनांची तपासणी केली जात आहे. यासाठी ठीकठीकाणी स्थिर व भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत. रविवारी देवरूख- साखरपा मार्गावरील मार्लेश्वर फाटा येथे वाहनाची तपासणी सुरू होती. गोव्याहून मुंबईाया दिशेने जाणाऱ्या इनोव्हा (गाडी क्रमांक एमएच- 05, एजे- 8856) गाडी पथकाकडून तपासणी करण्यात आली. तपासणी दरम्यान गाडीमध्ये जुगाराचे साहित्य मिळून आले आहे.

इनोव्हा गाडी, टेबल, मशीन, लोखंडी स्टँन्ड, जुगाराचे कॉइन असा एकूण 15 लाख 38 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती देवरूख पोलीस ठाण्यातून मिळाली आहे. या कारवाई दरम्यान या पथकामध्ये पोलीस निरीक्षक अतुल जाधव, पोलीस हेड काँन्स्टेबल सागर मुरूडकर, तेजस देशमुख, सािान पवार, शेखर जाधव यां समावेश आहे. याप्रकरणी धनंजय विजय कदम, सिध्देश आत्माराम पाटेकर (दोघेही रा. कार्जिडा पाटीलवाडी, ता. राजापुर), निलेश नामदेव माने, आदित्य विनोद पोळ यांच्यावर देवरूख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक अतुल जाधव करीत आहेत.