जिल्ह्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट!

रत्नागिरी:- पावसाने कोकण किनारपट्टीवर चांगला मुक्काम ठोकला आहे. सर्वत्र अतिवृष्टी ते मुसळधार पावसाने जोर धरलेला आहे. सोसाटय़ा वारा आणि मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत होऊ लागल्याचा प्रत्यय येत आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झालेली आहे. जिल्ह्यात गेल्या महिनाभरात झालेल्या पावसाने 1 हजार सरासरी देखील (सरासरी 1313.70) ओलांडलेली आहे. या पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असून आज मंगळवारी देखील जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

या हंगामात जूनच्या प्रारंभाला अगदी वेळेत मान्सूनचे आगमन झाले. जिल्ह्यात मान्सूनी बरसात या हंगामात सुरूवातीपासून समाधानकारक राहिली. या पावसाने यावर्षी खंड दिलेला नव्हता. पण कधी उघडीप तर कधी पावसा जोरदार सरी असे वातावरण राहिले होते. पण गेल्या तीन दिवसांपासून या पावसाने सर्वत्र चांगला जोर धरलेला आहे. संपूर्ण कोकण किनारपट्टीला या पावसाने झोडपून काढले आहे. अतिवृष्टी ते मुसळधार अशा स्वरूपाया पर्जन्यमानाने जिल्ह्यातील जनजीवनावर परिणाम झालेला आहे.

जिल्ह्यात जूनाच्या प्रारंभापासून झालेल्या दमदार पर्जन्यमानाची स्थिती पाहता आतापर्यंत 8 जूनपर्यंत एकूण 1182.26 मिमि इतके पर्जन्यमान झाले आहे. गेल्या महिनाभरात सरासरी 1313.70 इतके पर्जन्यमान झालेले आहे. आतापर्यंत झालेल्या पर्जन्यमानाच्या नोंदीनुसार सर्व तालुक्यात एक हजारापेक्षा जास्त मिमि पावसाची नोंद जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाकडे करण्यात आलेली आहे.