रत्नागिरी:- जिल्ह्यात पल्स पोलिओ मोहिमेला चांगला प्रतिसाद लाभला. या मोहीमेचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, आरोग्य सभापती महेश उर्फ बाबू म्हाप यांच्या हस्ते करण्यात आले. सकाळच्या सत्रात 90 टक्के लसीकरण मोहीम पूर्ण झाली.
जिल्हा शासकीय रुग्णालयात पल्स पोलीओ मोहीमेचा सकाळी आरंभ झाला. ग्रामीण भागात जिल्हा परिषद जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी नियोजन केले होते. डॉ. कमलापूरकर यांनी सकाळी 7 वाजल्यापासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत ही मोहीम राबविण्यात आली होती. ग्रामीण भागात 74 हजार 273 आणि शहरी भागात 13 हजार 383 असे एकूण 87 हजार 656 लाभार्थ्यांना लस देण्यासाठी ठिकठिकाणी लसीकरण केंद्र स्थापन करण्यात आली होती. त्यानुसार या मोहिमेसाठी 36 ट्रान्झिट टीम रेल्वेस्टेशन, बसस्थानक येथे नियुक्त केली होती. 113 मोबाईल टीमही ठिकठिकाणी कार्यरत होत्या. यामध्ये एकूण 4 हजार 106 कर्मचारी सहभागी झालेेले होते. 0 ते 5 वर्षे वयोगटातील सर्व बालकांना लस देण्यात आली. ग्रामीण भागात डॉ. कमलापूरकर यांनी विविध केंद्रांवर भेटी दिल्या.