जिल्ह्यात 84 ॲक्टीव्ह कन्टेन्मेंट झोन; रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक

रत्नागिरी:- जिल्ह्यात सध्या 84 ॲक्टीव्ह कन्टेन्मेंट झोन असून रत्नागिरी तालुक्यात 19 गावांमध्ये,  दापोली मध्ये 7 गावांमध्ये, खेड मध्ये 23 गावांमध्ये, लांजा तालुक्यात 6, चिपळूण तालुक्यात 17 गावांमध्ये, मंडणगड तालुक्यात 3 , गुहागर तालुक्यात 6 आणि राजापूर तालुक्यात 3 गावांमध्ये कंटेन्मेंट झोन आहेत.

सध्या ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 472 आहे. आज मौजे फणसोप सडा परिसर, रत्नागिरी मिरकरवाडा, रत्नागिरी पोलीस वसाहत, रत्नागिरी मौजे वाटद खंडाळा, रत्नागिरी आशीर्वाद अर्पाटमेंट माळनाका, रत्नागिरी मौजे नाचणे नरहरवसाहत, रत्नागिरी नर्सिंग हॉस्टेल गोगटे कॉलेज ग्राऊंड शेजारी, रत्नागिरी मयुरेश्वर कॉम्प्लेक्स आयटीआय हॉस्टेल समोर नाचणे,  रत्नागिरी मौजे जुवे, रत्नागिरी मौजे जयगड, रत्नागिरी मौजे कुणबीवाडी कसोप, रत्नागिरी मौजे भगवतीनगर भूतेवाडी, रत्नागिरी मौजे शेटयेवाडी शिरगाव, रत्नागिरी सनराईझ रसिडेन्सी आझादनगर मजगाव रोड, रत्नागिरी  हे क्षेत्र कोरोना विषाणू बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत.