रत्नागिरी:- जिल्ह्यात मागील 24 तासात 81 नवे कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. यामुळे कोरोना बाधित रुग्णसंख्येने साडेतीन हजारांचा टप्पा ओलांडला आहे. तर दोघा रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असून एकूण मृत्यूसंख्या 123 इतकी झाली आहे.
नव्याने सापडलेल्या रुग्णांमध्ये आरटीपीसीआर मधील रत्नागिरी तालुक्यात 18, मंडणगड 1, गुहागर 1, कामथे 3 तर ॲन्टीजेन टेस्ट मधील रत्नागिरीतील 4, कळंबणी 12, चिपळूण 11, लांजा 1, संगमेश्वर 21, परकार हॉस्पीटल 6, घरडा हॉस्पीटल 3 असे एकूण 23 अधिक 58 असे 81पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत.
मंगळवारी उपचारा दरम्यान 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात तालुका चिपळूण येथील 1 रुग्ण आणि तालुका खेड येथील 1 रुग्ण यांचा समावेश असून आतापर्यंत 123 जणांचा मृत्यू झाला आहे.