रत्नागिरी:- भारतीय हवामान खाते, कुलाबा, मुंबई यांच्याकडून पर्जन्यमान विषयक प्राप्त झालेल्या संदेशानुसार रत्नागिरी जिल्ह्यात 5 सप्टेंबर ते 8 सप्टेंबर 2021 या कालावधीत काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. नागरिकांनी या कालावधीत सुरक्षितता घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्ह्यात पावसाने मोठ्या विश्रांतीनंतर पुनरागमन केले आहे. मागील दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. पावसाचा जोर पुढील दोन ते तीन दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 8 सप्टेंबर पर्यंत अनेक भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तरी जनतेने सावधानता व सुरक्षितता बाळगावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.