रत्नागिरी:- जिल्ह्यात 70 नवे कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. यामुळे जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या 6 हजार 679 वर पोचली आहे. मागील 24 तासात तीन रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या 220 वर पोचली आहे.
नव्याने सापडलेल्या 70 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये आरटीपीसीआर टेस्ट केलेले 57 तर अँटिजेन टेस्ट केलेले 13 रुग्ण आहेत. यात दापोली तालुक्यात 2 रुग्ण, खेड 6, गुहागर 6, चिपळूण 14, संगमेश्वर 11, रत्नागिरीत 29, लांजा 1 आणि राजापूर तालुक्यात केवळ 1 रुग्ण सापडला आहे.
चोवीस तासात तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात खेड तालुक्यात 1 तर रत्नागिरी तालुक्यात 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 220 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक 64 बळी गेले आहेत.
जिल्ह्यात 4 हजार 43 जण होम क्वारंटाईन आहेत. नव्याने जाहीर कोरोना बाधित क्षेत्रमध्ये माखजन बौध्दवाडी, साखरपा भंडारवाडी, फुणगूस मुस्लीम मोहल्ला, दाभोळेवाडी मालपवाडी, माखजन वाणीवठार, साडवली सैनिकवसाहत, देवधामापूर बौध्दवाडी, कसबा संगमेश्वर भोईवाडी, शंकेश्वर पार्क, हनुमान सदन खडपे वठार, पोलीस हेड क्वॉर्टस, ए विंग शंकेश्वर पार्क जिल्हा परिषद शेजारी, 1643 कित्ते भंडारी हॉल जवळ, 102 गंगा निवास अर्पाटमेंट शेरे नाका, 3356 खालची आळी, 24 चंद्रकला भुवन तेली आळी,