रत्नागिरी:- शनिवारी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 652 तपासण्यांमध्ये केवळ 3 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर तब्बल 9 रुग्ण उपचारांती बरे झाले आहेत. नव्याने एकाही मृत्यूची नोंद करण्यात आलेली नाही.
जिल्ह्यात 24 तासात 9 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत 81 हजार 846 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण 96.94 टक्के आहे. नव्याने 3 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने एकूण बाधित रुग्णसंख्या 84 हजार 433 इतकी झाली आहे.
जिल्ह्यात कोरोनाने आतापर्यंत 2 हजार 534 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्युदर 3 टक्के आहे. जिल्ह्यात गृह विलगीकरणात 27 तर संस्थात्मक विलीगिकरणात 26 रुग्ण उपचार घेत आहेत.