रत्नागिरी:-जिल्ह्यात मागील 24 तासात 520 तर त्यापूर्वीचे 103 असे एकूण 623 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. नव्याने सापडलेल्या रुग्णांमध्ये आरटीपीसीआर चाचणी केलेल्या 335 तर अँटीजेन चाचणी केलेल्या 185 तर यापूर्वीच्या 103 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढून 45 हजार 936 इतकी झाली आहे.
जिल्ह्यात 24 तासात 8 तर त्यापूर्वीचे 8 अशा 16 मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1 हजार 561 मृत्यू झाले आहेत. जिल्ह्याचा मृत्यूदर 3.39 टक्के आहे. जिल्ह्यात सर्वाधिक मृत्यू रत्नागिरी तालुक्यात 462 मृत्यू, चिपळूण 300, संगमेश्वर तालुक्यात 180, खेड तालुक्यात 151 मृत्यू झाले आहेत. सर्वात कमी मृत्यू मंडणगड तालुक्यात केवळ 13 झाले आहेत.
जिल्ह्यात गुरुवारी 538, शुक्रवारी 683, शनिवारी 426, रविवारी 484, सोमवारी 488, मंगळवारी 655 रुग्ण सापडले होते. नव्याने 623 रुग्ण सापडले असून यापैकी आरटीपीसीआर चाचणी केलेल्या 1 हजार 845 पैकी 335 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर अँटीजेन टेस्ट केलेल्या 3 हजार 148 पैकी 185 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 45 हजार 936 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. 24 तासात 4 हजार 993 चाचण्या करण्यात आल्या असून यापैकी 520 जण पॉझिटिव्ह सापडले आहेत.