जिल्ह्यात 61 नवे रुग्ण; रुग्णसंख्या 1500 नजीक

रत्नागिरी:- गेल्या 24 तासात प्राप्त अहवालांमध्ये 61 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1499 झाली आहे. आज आढळलेल्या रुग्णांमध्ये रत्नागिरी – 31, घरडा खेड – 11, दापोली-04, कळंबणी-15 येथील रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान 46 रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 904 झाली आहे. आज बरे झालेल्यांमध्ये जिल्हा कोव्हीड रुग्णालय 5, संगमेश्वर 1, कोव्हीड केअर सेंटर वेळणेश्वर 5, कोव्हीड केअर सेंटर केकेव्ही, दापोली  8,  उपजिल्हा रुग्णालय कामथे-1, कोव्हीड केअर सेंटर समाजकल्याण 4, कोव्हीड केअर सेंटर घरडा, खेड 12, कोव्हीड केअर सेंटर पाचल 5 आणि  कोव्हीड केअर सेंटर मंडणगड 5  मधील आहेत.