रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोना लसीकरण सुरु असून आतापर्यंत १० लाख ५१ हजार ३८६ जणांनी पहिला डोस घेतला आहे. तर ८ लाख ४९ हजार ९४१ जणांनी दोन्ही डोस घेतले आहेत. १५ ते १७ वयोगटात आतापर्यंत १४ हजार ७२३ जणांनी दोन्ही डोस घेतले आहेत. तर बूस्टर डोस घेणार्यांची संख्या ५ हजार ७५६ आहे.
कोरोना लसीकरण तीन गटांमध्ये सुरु आहे. १८ वर्षांवरील वयोगटाबरोबरच आता १५ ते १७ वयोगटातील मुलांचेही लसीकरण सुरू झाले आहे. त्याचबरोबर ६० वर्षांवरील नागरीक आणि आरोग्य कर्मचार्यांना बूस्टर डोस देण्यात येत आहेत. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत १० लाख ५१ हजार ३८६ जणांनी पहिला डोस घेतला. पहिला डोस घेणार्यांचे प्रमाण १७.१८ टक्के आहे. दुसरा डोस ८ लाख ४९ हजार ९४१ जणांनी घेतला. दुसरा डोस घेणार्यांचे प्रमाण ७८.५६ टक्के आहे. १५ ते १७ वयोगटात पहिला डोस ४७ हजार ९८४ जणांनी घेतला. पहिला डोस घेणार्यांचे प्रमाण ६६.८८ टक्के आहे. दुसरा डोस १४ हजार ७२३ जणांनी घेतला आहे. दुसरा डोस घेणार्यांचे प्रमाण २०.५२ टक्के आहे. बूस्टर डोस घेणार्यांचे प्रमाण १६.७२ टक्के आहे. आतापर्यंत ५ हजार ७५६ जणांनी बूस्टर डोस घेतला आहे.