रत्नागिरी:- मंगळवारी सायंकाळी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 386 नवे बाधित रुग्ण सापडले आहेत. तर एकूण 8 मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या 64 हजार 595 तर जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट 7. 76 टक्के आहे.
जिल्ह्यात 24 तासात 370 तर यापूर्वीचे 16 रुग्ण सापडले आहेत. यात आरटीपीसीआर चाचणी केलेले 187 तर अँटीजेन चाचणी केलेले 183 जण पॉझिटिव्ह सापडले आहेत. नव्याने 386 रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात आतापर्यंत 64 हजार 595 झाली आहे.
मंगळवारी 4 हजार 543 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आता पर्यंत 4 लाख 11 हजार 339 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 24 तासात 700 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आता पर्यंत 57 हजार 181 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनामुक्तीचा दर 88.82 टक्के आहे.
जिल्ह्यात नव्याने 8 मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यात 24 तासात 3 तर यापूर्वीचे 5 अशा आठ मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्याचा मृत्युदर 2.83 टक्के इतका आहे. जिल्ह्यात गृहवीलगिकरणात 2 हजार 96 तर संस्थात्मक विलीगिकरणात 2 हजार 889 जण उपचार घेत आहेत.