रत्नागिरी:- मंगळवारी आलेल्या अहवालानुसार केवळ 89 कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 2 रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
जिल्ह्यात 24 तासात 139 रुग्ण उपचाराअंती कोरोनामुक्त झाले असून आतापर्यँत 74 हजार 363 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण 96.13 टक्के आहे. नव्याने 89 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने एकूण बाधित रुग्णसंख्या 77 हजार 357 इतकी झाली आहे.
कोरोनाने नव्याने 2 मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. 2 मृत्यू 24 तासातील आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 396 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्युदर 3.10 टक्के आहे. जिल्ह्यात गृह विलीगिकरणात 329 तर संस्थात्मक विलीकरणात 269 रुग्ण उपचार घेत आहेत.