जिल्ह्यात 24 तासात 519  पॉझिटिव्ह; 4 जणांचा मृत्यू

रत्नागिरी:-जिल्ह्यात मागील 24 तासात 519  पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यानंतर जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढून 57 हजार 926 इतकी झाली आहे. यादरम्यान जिल्ह्यात 6,693 कोरोना अहवाल निगेटिव्ह आले असून आतापर्यंत 3 लाख 25 हजार 81 अहवाल अबाधित आले आहेत. जिल्ह्यात आज 4 जणांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात मागील 24 तासात 4 जणांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत एकूण 1667 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा आतापर्यंतचा मृत्यूदर 2.85% आहे. आज 634 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत एकूण 50 हजार 554 रुग्ण बरे झाले आहेत. जिल्ह्यातील कोरोनामुक्‍त होण्याचे प्रमाण 87.27% आहे.

जिल्ह्यात शनिवारी 251, रविवारी 241 तर सोमवारी 411 रुग्ण सापडले होते. नव्याने 519 रुग्ण सापडले असून यापैकी आतापर्यंत 49 हजार 250 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. 24 तासात 7 हजार 212 चाचण्या करण्यात आल्या असून यापैकी 519 जण पॉझिटिव्ह सापडले असून जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट 8.82% आहे.