जिल्ह्यात 24 तासात 508 कोरोना बाधित; रुग्णसंख्या 36 हजार पार

रत्नागिरी:- जिल्ह्यात मागील 24 तासात जिल्ह्यात 508 नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. नव्याने सापडलेल्या 508 रुणांपैकी 296 रुग्ण हे आरटीपीसीआर चाचणी केलेले आहेत तर 212 रुग्ण अँटीजेन चाचणी केलेले आहेत. 508 नव्या रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढून 36 हजार 044 झाली आहे. जिल्ह्यात तब्बल  1966 कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. मागील चोवीस तासात 14 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात  सोमवारी 393, मंगळवारी 315, बुधवारी 635, गुरुवारी 437, शुक्रवारी 416 तर शनिवारी 494 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले होते. हाती आलेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात 508 नवे रुग्ण सापडले आहेत तर गेल्या 24 तासात 834 आरटीपीसीआर अहवाल निगेटिव्ह तर 1132 अँटीजेन अहवाल निगेटिव्ह आले आहेत.  जिल्ह्यातील पॉझिटिव्हीटी  रेट 17.67% इतका आहे. मागील चोवीस तासात 14 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 1217 जणांचा बळी गेला आहे.