जिल्ह्यात 24 तासात 411 तर त्यापूर्वीच्या 107 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद 

रत्नागिरी:-जिल्ह्यात मागील 24 तासात 411 तर त्यापूर्वीचे 107 असे एकूण 508 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. नव्याने सापडलेल्या रुग्णांमध्ये आरटीपीसीआर चाचणी केलेल्या 258 तर अँटीजेन चाचणी केलेल्या 153 तर यापूर्वीच्या 107 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढून 48 हजार 731 इतकी झाली आहे. 

जिल्ह्यात 24 तासात 9 तर त्यापूर्वीचे 1 अशा 10 मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1 हजार 649 मृत्यू झाले आहेत. जिल्ह्याचा मृत्यूदर 3.38 टक्के आहे. जिल्ह्यात सर्वाधिक मृत्यू रत्नागिरी तालुक्यात आतापर्यंत 491, चिपळूण 309, संगमेश्वर तालुक्यात 191, खेड तालुक्यात 163 मृत्यू झाले आहेत. सर्वात कमी मृत्यू मंडणगड तालुक्यात केवळ 13 झाले आहेत.

जिल्ह्यात शनिवारी 251, रविवारी 457 रुग्ण सापडले होते. नव्याने 411 रुग्ण सापडले असून यापैकी आरटीपीसीआर चाचणी केलेल्या 2 हजार 226 पैकी 258 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर अँटीजेन टेस्ट केलेल्या 2 हजार 432 पैकी 153 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 48 हजार 731 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. 24 तासात 4 हजार 698 चाचण्या करण्यात आल्या असून यापैकी 411 जण पॉझिटिव्ह सापडले असून जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट 8.82% आहे.