रत्नागिरी:- जिल्ह्यात मागील 24 तासात जिल्ह्यात 393 नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यातील 269 रुग्ण हे आरटीपीसीआर चाचणी केलेले आहेत तर 124 रुग्ण अँटीजेन चाचणी केलेले आहेत. 24 तासात 920 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. नवे 393 रुग्ण सापडल्याने जिल्ह्याची रुग्णसंख्या 33 हजार 239 झाली आहे. चोवीस तासात 13 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात बुधवारी 343, गुरुवारी 339, शुक्रवारी 450 तर शनिवारी 372, रविवारी 402 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले होते. हाती आलेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात 393 नवे रुग्ण सापडले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 269 रुग्ण आरटीपीसीआर तर 124 रुग्ण अँटीजेन चाचणीत बाधित सापडले आहेत. जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 33 हजार 239 वर जाऊन पोहचली आहे.
मागील 24 तासात 920 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. यात आरटीपीसीआर चाचणी केलेल्या 810 जणांपैकी 541 निगेटिव्ह तर अँटीजेन टेस्ट केलेल्या 503 पैकी 379 निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात चोवीस तासात 13 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून आतापर्यंत एकूण 1098 कोरोनाबळी गेले आहे. जिल्ह्यातील मृत्यूदर 3.30 % इतका आहे.