जिल्ह्यात 24 तासात 15 जणांचा मृत्यू; दोन दिवसात 25 बळी

रत्नागिरी:– जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या निम्म्याने घटली असताना मृत्यू संख्या मात्र वाढली आहे. मागील 24 तासात जिल्ह्यात 15 जणांचा मृत्यू झाला आहे. दोन दिवसात 25 रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाने 464 जणांचा मृत्यू झाला आहे. 

 सोमवारी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 259 रुग्ण सापडले आहेत. रुग्णसंख्या निम्म्याने घटली असली तरी 24 तासात उपचाराखाली असलेल्या 15 जणांचा मृत्यू झाला आहे. यात खेड तालुक्यात 6, गुहागर तालुक्यात 3, रत्नागिरीत 4 आणि चिपळूण व राजापूर तालुक्यात प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 464 जणांचा मृत्यू झाला आहे.