रत्नागिरी:- जिल्ह्यात नियमितपणे कोरोना बाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. गेल्या चोवीस तासात 119 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यामुळे जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्येने 4 हजार 855 चा टप्पा गाठला आहे. तर मागील चोवीस तासात तीन रुग्णांचे मृत्यू झाले असून जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या वाढून 144 वर पोचली आहे.
नव्याने आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आरटीपीसीआर टेस्ट केलेले 55 तर अँटिजेन टेस्ट केलेले 64 असे एकूण 119 नवे रुग्ण सापडले आहेत. रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक 59 रुग्ण सापडले आहेत. आरटीपीसीआर टेस्ट केलेल्या रुग्णांमध्ये गुहागर 3, चिपळूण 17, रत्नागिरीत 33 आणि लांजा तालुक्यात 2 रुग्ण सापडले आहेत. तर अँटिजेन टेस्ट केलेल्यांमध्ये खेड 24, गुहागर 6, चिपळूण 2, संगमेश्वर 1, रत्नागिरीत 26 आणि लांजा तालुक्यातील 5 रुग्ण सापडले आहेत.
आज जिल्ह्यात उपचारा दरम्यान 3 रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये लांजा तालुक्यातील 1, खेड तालुक्यातील 1 तसेच चिपळूण तालुक्यातील एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या 144 झाली आहे. आतापर्यंत मंडणगड तालुक्यात 2 मृत्यू, खेड 16, दापोली 22, चिपळूण 31, गुहागर 4, संगमेश्वर 12, रत्नागिरी 44, लांजा 5 आणि राजापूर तालुक्यात 8 जणांचा मृत्यू झाला आहे.