रत्नागिरी:- जिल्ह्यात चोवीस तासात सापडणाऱ्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या देखील हळूहळू वाढू लागली आहे. मागील 24 तासात जिल्ह्यात 21 नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. याच कालावधीत 367 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
मागील काही दिवसांपासून पॉझिटिव्ह रुग्ण सापडण्याचे प्रमाण कमी झाले होते. मात्र मागील दोन दिवसांपासून पॉझिटिव्ह रुग्ण सापडण्याचे प्रमाण तुलनेत वाढले आहे. नव्याने 21 रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात आतापर्यंत 8 हजार 639 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. मागील चोवीस तासात तब्बल 3689 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आता पर्यंत 51 हजार 534 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
चोवीस तासात तब्बल 6 रुग्ण बरे झाले असून आता पर्यंत 8 हजार 158 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील चोवीस तासात जिल्ह्यात कोरोनाने एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या 319 असून जिल्ह्यात रिकव्हरी रेट 94.43 टक्के आहे.