रत्नागिरी:- जिल्ह्यात एका दिवसातील सर्वाधिक पॉझिटिव्ह रुग्ण शुक्रवारी सापडून आले. मागील 24 तासात तब्बल 145 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील सर्वाधिक 82 रुग्ण रत्नागिरी तालुक्यातील आहेत. तर उपचारादरम्यान सहा जणांचा मृत्यू झाला असून मृत्यूसंख्या 118 वर पोचली आहे.
नव्याने सापडलेल्या रुग्णांमध्ये आरटीपीसीआर मधील रत्नागिरीतील 8 आणि ॲन्टीजेन टेस्ट मधील रत्नागिरीतील 74, लांजा 2, राजापूर 1, कामथे 55, संगमेश्वर (देवरुख) 5 असे एकूण 08 अधिक 137 असे 145 पॉझिटिव्ह रुग्ण आले आहेत
दरम्यान सहा जणांचा मृत्यू झाला आहे. यात रत्नागिरीतील 2, चिपळूण 2, दापोली 1 आणि संगमेश्वर 1 यांचा समावेश असून एकूण मृत्यू संख्या 118 झाली आहे.