जिल्ह्यात 1 हजार 54 रुग्ण कोरोनामुक्त

रत्नागिरी:- जिल्ह्यात 67 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. या रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1 हजार 54  झाली आहे. सोमवारी बरे झालेल्यांमध्ये जिल्हा कोव्हीड रुग्णालय 1, कोव्हीड केअर सेंटर केकेव्ही, दापोली 2, कोव्हीड केअर सेंटर घरडा, खेड 26, आणि  38 कोव्हीड केअर सेंटर पेंढांबे, चिपळूण  मधील आहेत.
   

जिल्ह्यात सध्या 197 ॲक्टीव्ह कन्टेन्मेंट झोन असून रत्नागिरी तालुक्यात 20 गावांमध्ये, दापोली मध्ये 11 गावांमध्ये, खेड मध्ये 60 गावांमध्ये, लांजा तालुक्यात 6, चिपळूण तालुक्यात 88 गावांमध्ये, मंडणगड तालुक्यात 1 , गुहागर तालुक्यात 9 आणि राजापूर तालुक्यात 2 गावांमध्ये कंटेन्मेंट झोन आहेत.