जिल्ह्यात 1 हजार 091 अहवालांमध्ये अवघे 5 पॉझिटिव्ह रुग्ण 

रत्नागिरी:- नव्याने आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 1 हजार 091 अहवालांपैकी केवळ 5 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर मागील 24 तासात जिल्ह्यात कोरोनाने एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.

जिल्ह्यात 24 तासात 7 रुग्ण उपचाराअंती कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत 76 हजार 467 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण वाढून  96.80 टक्के आहे. नव्याने 5 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने एकूण बाधित रुग्णसंख्या 78 हजार 997 इतकी झाली आहे. 

 जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 483 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्युदर 3.14 टक्के आहे. जिल्ह्यात गृह विलगीकरणात 25 तर संस्थात्मक विलगीकरणात 19 रुग्ण उपचार घेत आहेत.