जिल्ह्यात 1 लाख 66 हजार 660 घरांमध्ये गणरायाची प्रतिष्ठापना

रत्नागिरी:- कोरोनाच्या महामारीवर मात करीत कोकणात मोठ्या भक्तीभावाने साजर्‍या होणार्‍या गणेशोत्सवासाठी भक्तगण सज्ज झाले आहेत. जिल्ह्यात 1 लाख 66 हजार 660 ठिकाणी खासगी तर 108 ठिकाणी सार्वजनिक गणेश मुर्तींची प्रतिष्ठापना होणार आहे. कोरोनामुळे घरगुती गणपतीच्या प्रतिष्ठापनेवर फार परिणाम होणार नाही. परंतु अनेक सार्वजनिक गणेश मंडळानी यंदाचा गणेशोत्सव रद्द केला आहे. आता 5 मंडळांनी उत्सव रद्द केला आहे. ही संख्या आणखी वाढणार आहे. त्यामुळे सार्वजनिक डामडोल असणार्‍या गणेश मंडळाचा कोरोनाने हिरमोड केला आहे.

गणेशोत्सव हा कोकणातील सर्वांत मोठा उत्सव आहे. यासाठी चाकरमानी आदी महिना ते दोन महिने सुट्ट्यांचे नियोजन करतात. या काळात गावी येण्याची विलक्षण ओढ त्यांच्या म नात असते. परंतु कोरोना महामारीने या उत्सहावार पाणी फिरले आहे. तरी गणेश भक्तांनी विघ्नहर्ता करीता सर्व संकट बाजूला ठेऊन जिल्ह्यात दाखल झाले आहेत. मात्र तो उत्सहा, ते अल्हाददायक वातावरण तसे कमीच. गणेशोत्सवासाठी सजलेल्या बाजारपेठा, आकर्षक मकर, हार, इलेक्ट्रॉनिक वस्तू आदीचा झगमगाटही कमी दिसत आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आलेल्या मर्यादांमुळे ही परिस्थिती ओढावली आहे. थर्माकॉलच्या बंदीचाही बाजारपेठेत परिणाम दिसत आहेत. तसे मकर दिसत नाहीत. घरामध्ये आरतीसाठी ढोलकी हवी म्हणून, ढोलकीची चामडी, पाती बदलण्यापासून, नवीन ढोलकी आणण्यापर्यंत गणेशभक्तांची लगबगही कोरोनामुळे दुर्मिळ झाली आहे.

जिल्ह्यामध्ये यंदा 1 लाख 66 हजार 660 घरांमध्ये गणरायाची प्रतिष्टापना होणार आहे. 112 सार्वजनिक गणेश मंडळामध्ये गणेशाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. रत्नागिरी शहरामध्ये तब्बल 29 सार्वजनिक गणेशोत्सव आहेत. त्यात श्री रत्नागिरीचा राजा, रत्नागिरीचा राजा या मंडळांची आरास मोठी असते. मात्र यंदा मडंळानी उत्सव रद्द कला आहे. पाऊणशे वर्षांची परंपरा असणार्‍या टिळकआळी गणेशोत्सव मंडळांसारखी सामाजिक उपक्रम राबविणारी मंडळांनीही आगमनाचे वेध लागले आहे. पण त्याला बंधणे आली आहेत.

रत्नागिरी शहरामध्ये 7,911 घरगुती तर 29 सार्वजनिक गणेशोत्सवांची प्राणप्रतिष्ठापना केली जाणार आहे. त्यापैकी श्री रत्नागिरीचा राजाचा उत्सव रद्द केली आहे. रत्नागिरीच्या ग्रामीण भागात 9 हजार 432 घरगुती व केवळ 1 सार्वजनिक, जयगड परिसरात 2801 घरगुती तर 5 सार्वजनिक, संगमेश्वर 13,543 घरगुती तर 1 सार्वजनिक, राजापूर 19,900 घरगुती तर 6 सार्वजनिक, त्यापैकी 1 रद्द झाला आहे.  नाटे 7,279 घरगुती तर 2 सार्वजनिक, लांजा 13,542 घरगुती तर 5 सार्वजनिक, देवरूख 12,493 घरगुती तर 7 सार्वजनिक एक रद्द झाला आहे. सावर्डे 10,240 घरगुती तर 2 सार्वजनिक, चिपळूण 16, 464 घरगुती तर 14 सार्वजनिक असून 1 रद्द झाला आहे.  गुहागर 14,460 घरगुती तर 2 सार्वजनिक, अलोरे 5 हजार 650 घरगुती तर 3 सार्वजनिक, खेड 13,738 घरगुती तर 17 सार्वजनिक, दापोली 6333 घरगुती तर 9 सार्वजनिक, मंडणगड 4,389 घरगुती तर 6 सार्वजनिक, बाणकोटमध्ये 768 घरगुती तर 2 सार्वजनिक, पूर्णगडमध्ये 5,675 खासगी आणि 1 सार्वजनिक आणि दाभोळमध्ये 1 हजार 886 खासगी तर एका ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सवाची प्रतिष्ठापना होणार आहे. घरगुती गणेशाच्या प्रतिष्ठापणेचा आकडा कमी होण्याची शक्यता कमी आहे. मात्र अनेक सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेशोत्सव रद्द केली आहे. पोलिसांकडे 5 मंडळानी उत्सव रद्द केल्याचे कळविले असले तरी यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.