नऊ टॅंकरद्वारे पाणी पुरवठा; ११ हजार ३६० लोक बाधित
रत्नागिरी:- जिल्ह्यात वाढत्या उष्म्याबरोबर आता पाणी टंचाईची झळ ग्रामस्थांना बसु लागली आहे. एकुण २९ गाव आणि ५३ वाड्यांना पाणी टंचाई भासत आहे. त्यांशा शासकीय आणि खासगी टॅंकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा होत सुरू आहे. सुमारे १७५ टॅंकरच्या फेऱ्या जिल्ह्यात सुरू झाल्या आहेत. जिल्ह्यातील ६ तालुक्यांमध्ये पाणी टंचाई भासू लागली असून ११ हजार ३६० लोक टंचाईच्या छायेत आहेत.
जिल्ह्यातील ग्रामीण भागत विशेषतः खेडमध्ये पहिल्यांदा पाणी टंचाई भागात टॅंकर सुरू झाला. जलजीवन मिशनअंतर्गत पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून दरवर्षी आराखडा तयार केला जातो. गेल्या वर्षी हा आराखडा सुमारे ११ कोटीचा होता. परंतु जलजीवन मिशनमधून अनेक कामे झाल्यामुळे यंदा टंचाई आराखडा घटला आहे. सुमारे ५ कोटीचा टंचाई आराखडा आहे. हर घर नलसे जल योजना सुरू असली तरी पाणी टंचाईचे प्रश्न गंभीर होत आहे. एप्रिल महिन्यातच ही परिस्थिती आहे. मे महिन्यात यापेक्षा गंभीर परिस्थिती उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाकडे सोमवारपर्यंत प्राप्त झालेल्या टंचाई अहवालामध्ये २९ गावे ५३ वाढ्यांना टंचाईची झळ बसली आहे. या चार शासकीय तर ५ खासगी टॅंकरनी १७५ फेऱ्यांद्वारे हा पाणी पुरवठा केला जात आहे. या वाड्यामधील ११ हजार ३६० जणांनी पाणी टंचाईची झळ बसली आहे. दर आठवड्याला पाणी टंचाईची गावे आणि वाड्यामध्ये वाढ होत आहे. प्रामुख्यांना जिल्ह्यातील ६ तालुक्यात पाणी टंचाई भासत असून खेड आणि चिपळूण तालुक्यात सर्वांत जास्त पाणी टंचाईचे संकट आहे.