जिल्ह्यात सलग दुसर्‍या दिवशी कोरोनाचे सात बळी

रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोनाने चोवीस तासात सात बळी घेतले आहेत. यामुळे जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या 182 वर पोचली आहे. जिल्ह्यात नव्याने 79 रुग्ण सापडले आहेत. यामुळे जिल्ह्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या 6 हजार 145 वर पोचली आहे. 

मृत्यू झालेल्यांमध्ये रत्नागिरीतील एक पुरुष आणि एक स्त्री रुग्ण, चिपळूण मधील एक पुरुष आणि एक स्त्री रुग्ण, खेड मधील 2 पुरुष आणि एका स्त्री रुग्णाचा समावेश आहे. मागील 24 तासात 79 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यात खेडमधील 21, गुहागर 12, चिपळूण 13, संगमेश्वर 5, रत्नागिरी 23 आणि लांजा तालुक्यात 5 रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्यात होम क्वारंटाईन 4 हजार 647 जण आहेत.