ना. सामंत; कोरोना योद्ध्यांच्या कामावर शाबासकीची थाप
रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोनाविरुद्ध सर्व यंत्रणा चांगल्या पद्धतीने लढत आहे. त्यामुळे आज कोरोनावर नियंत्रण मिळवता आले आहे. हड ह्युम्युनिटी तयार झाल्याने बाधित रुग्ण कमी प्रमाणात मिळत आहेत. मात्र भविष्याचा विचार करून जिल्ह्यासाठी सुमारे 72 लाखाचा ऑक्सिजन प्लँट उभारण्यात येणार आहे. तसेच येत्या आठ दिवसांमध्ये प्लाझमाथेरपी सुरू केली जाईल, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षमंत्री उदय सामंत यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
श्री. सामंत म्हणाले, जिल्ह्याचा कोरोनाबाबतचा रिकव्हरी रेट (बरे होण्याचे प्रमाण) 87. 53 टक्के म्हणजे चांगला आहे. आता मृत्यू दर कमी करण्यावर आमचा भर आहे. आजवर मृत झालेले 285 पैकी 100 मृत हे लॅब सुरू होण्यापूर्वी मृत झालेले आहेत. कोविड प्रमाणे त्यांच्यावर अंत्यविधी केला आहे. त्यामुळे त्यातील किती पॉझिटिव्ह आहेत. याची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. सध्या दिवसाला 260 ते 500 पर्यंत प्रयोगशाळेत नमुने तपासले जात आहेत आहेत. हड ह्युम्युनिटी तयार झाल्याने बाधितांचे प्रमाण कमी झाले आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मास्क लावणे बंधनकारक आहे. आतापर्यंत मास्क न वापरणार्यांवर ग्रामीण भागात महसुल विभाग कारवाई करत होता. मात्र आजपासून आम्ही पोलिस विभागालाही मास्क न वापरणार्यांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच मृत झालेल्यांचाही स्टडी करण्यात येणार
आहे.
जिल्हा रुग्णालयातील सिव्हिल सर्जन पदावर आता पडदा पडला आहे. डॉ. फुले या अधिकृत शल्य चिकित्सक आहेत. मात्र काम बंद करण्याचा इशारा देणार्यांची हिटलरशाही चालणार नाही. त्यांचे ते वैयक्तिक मत असल्याचे दुसरे पत्र त्याच संघटनेचे आले आहे. त्यामुळे बोल्डे समर्थकांनी आता सोलापूरला जावे, अशी कोपरखळी सामंत यांनी हानली. कोरोनाचा प्रभाव कमी होताना दिसत असला तरी उपाययोजनांमध्ये कोणतीही कमी दिसणार नाही. आठ दिवसांमध्ये आम्ही प्लाझमाथेरपी सुरू करणार आहेत. तर बाधितांना ऑक्सिजनची कमी पडू नये, यासाठी 72 लाखाचा प्लॅन्ट उभारला जाणार आहे. कोविड आणि नॉन कोविडला त्याचा फायदा होणार आहे. कोविडच्या काळात ज्या-ज्या डॉक्टरांनी शासनाला मदत केली आहे. त्यांना शासन कधीच वार्यावर सोडणार नाही.