कोरोनाचे उपचार सुरु असताना म्युकरमायकोसिसची लागण
रत्नागिरी:- रत्नागिरीत म्युकरमायकोसिसची लागण झालेल्या रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. कोरोनाची पॉझिटिव्ह आल्यानंतर रुग्णालयात उपचार सुरु असताना म्युकरमायकोसिसची लागण झालेल्या या रुग्णाचा ऑक्सिजनचे प्रमाण खूप कमी झाल्याने मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिली.
मृत 35 वर्षीय संशयित रुग्ण खासगी संस्थेत चालक म्हणून काम असल्याची माहिती असून म्युकर मायकोसिसचा कोकणातही शिरकाव झाल्याची भीती निर्माण झाली आहे. संशयीत रुग्ण चिपळूण मधील नायशी गावातला रहिवासी असून संशयित रुग्णाचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह होता. संबंधित रुग्णावर चिपळूण मधील कामथे रुग्णालयात उपचार सुरू असताना घेतला अखेरचा श्वास घेतला.
कोरोनाचा उपचार घेत असलेल्या रुग्णाचे ऑक्सिजनचे प्रमाण खूप कमी होते तसेच त्यास डायबिटीस झालेला होता आणि नुकतीच त्याला सदर म्युकरमायकोसिसची नुकतीच लागण झाली असली तरी या रुग्णाचा मृत्यू कोरोनामुळे झालेला आहे अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी दिली. जिल्ह्यातून उपचारासाठी केईएम रुग्णालय मुंबई येथे हलविण्यात आलेल्या जिल्ह्यातील एका रुग्णाचा 16 मे 2021 रोजी म्युकरमायकोसिस आजाराने मृत्यू झालेला आहे.