रत्नागिरी:-दोन दिवस रत्नागिरी तालुक्याला झोडपणार्या पावसाचा जोर मंगळवारी ओसरला असला तरी संततधार कायम होती. दिवसभर ढगाळ वातावरण होते. पाऊस सक्रिय झाल्याने शेतीच्या कामांनी जोर पकडला आहे.
जिल्ह्यात मंगळवारी सकाळी 8.30 वाजेपर्यंतच्या चोविस तासात सरासरी 34.9 मिमी पाऊस झाला. त्यात मंडणगड 21.30, दापोली 28.80, खेड 17.20, गुहागर 82.80, चिपळूण 30.30, संगमेश्वर 34.10, रत्नागिरी 36.30, राजापूर 25.90, लांजा 30.10 मिमी पाऊस पडेल. रविवारी दुपारपासून सुरु झालेला पाऊस सोमवारी पहाटेपर्यंत कोसळत होता. खेड खोपी येथील महेश वसंत निकम हे 10 जुनला घरातून बेपत्ता झाले होते. त्यांचा मृतदेह चक्रवती नदी जवळ सापडल आहे. त्यांच्या मृत्यूचे कारण अजूनही समजू शकलेले नाही. रत्नागिरी तालुक्यात शिरगाव येथे महेंद्र प्रभाकर खामकर व इतर 4 जणांच्या शेतात शिरले. येथील नर्सरीमधील नारळ, आंबा रोपे वाहून गेली. तसेच पेरलेल्या भात क्षेत्रात माती आल्यामुळे ते वाया गेले आहे. त्याठिकाणी पुनर्पेरणीही करणे अशक्य आहे. हरचिरी येथे रस्त्यावर दरड कोसळल्यामुळे रस्ता बंद असून बांधकाम विभाग ती हटविण्याचे काम करत आहे. कुरतडे येथील चंद्रकांत अरविंद लिंगायत यांची (एमएच 3 बीएच 3340) चारचाकी गाडी टेंबे पुलावरुन वाहून गेली आहे. तसेच उक्षी येथे दरड कोसळल्यामुळे रस्ता बंद झाला आहे. राजापूर तालुक्यात धोपेश्वर येथील गणपती मंदीराची संरक्षक भिंत कोसळली. तर गोवळ-बुरंवेवाडी या रस्त्यावर पन्हाळेतर्फे राजापूर येथे मोरी खचली आहे.