१० किमी क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर
रत्नागिरी:- राज्यात बर्ड फ्ल्यूचा धोका आहे. त्यातच आता रत्नागिरी जिल्ह्यातही बर्ड फ्ल्यूचा शिरकाव झाला आहे. दापोलीमध्ये आढळलेल्या मृत कावळ्यांचा अहवाल तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. तो अहवाल प्राप्त झाला आहे. हा अहवाल पॉझिटिव्ह आला असून मृत कावळ्यांना बर्ड फ्ल्यूच झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
मागील आठवड्यात गुरुवारी अशाच प्रकारे सापडलेले ते मृत कावळे तालुका पशुवैद्यकीय अधिकारी यांनी प्राथमिक तपासणी करून मृत पक्षी शवविच्छेदनासाठी पुणे इथे पाठवले होते, मात्र त्यांचा अहवाल प्राप्त होण्यापूर्वीच शहरात अचानक आणखी दोन कावळे मृतावस्थेत सापडल्याने खळबळ उडाली होती. त्यानंतर मृत कावळ्यांचा अहवाल तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. तो अहवाल प्राप्त झाला आहे. हा अहवाल पॉझिटिव्ह आला असून मृत कावळ्यांना बर्ड फ्ल्यूच झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
दापोली शहरात ‘बर्ड फ्लू’चा शिरकाव झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे दापोली परिसर पक्षी व अंडी वाहतुकीसाठी प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर झाला आहे. १० की.मी.क्षेत्र हे प्रतिबंधित क्षेत्र असून १० किमी परिसरातील पोल्ट्री मधील कोंबड्या व पक्षी यांचे सॅम्पल घेऊन ते तपासणी साठी पाठवले जाणार असल्याची माहिती पशुसंवर्धन वैद्यकीय अधिकारी डॉ. लोंढे यांनी दिली आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, आवश्यक ती काळजी घ्यावी व पक्षी मृतावस्थेत आढळल्यास हात न लावता तात्काळ पशुसंवर्धन विभागाजवळ संपर्क करावा, असे आवाहन डॉ.लोंढे यांनी केले आहे.