जिल्ह्यात प्रथमच शून्य मृत्यूची नोंद; 24 तासात 134 पॉझिटिव्ह रुग्ण

रत्नागिरी:- सातत्याने वाढणारी मृत्यूसंख्या चिंतेचा विषय ठरत असताना बुधवारी यातून दिलासा मिळाला. बुधवारी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात शून्य मृत्यूची नोंद करण्यात आली. तर 24 तासात 134 कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. 

जिल्ह्यात 24 तासात 64 रुग्ण उपचाराअंती कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत 72 हजार 433 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण 95. 32 टक्के आहे. नव्याने 134 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने एकूण बाधित रुग्णसंख्या 76 हजार 1 इतकी झाली आहे. 

 जिल्ह्यात मंगळवारी तब्बल 27 मृत्यूची नोंद करण्यात आली होती. वाढती मृत्यूसंख्या चिंतेचा विषय ठरत असताना बुधवारी दिलासा मिळाला. बुधवारी एकही मृत्यू झालेला नाही. जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 343 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्युदर 3.08 टक्के आहे. जिल्ह्यात गृह विलीगिकरणात 489 तर संस्थात्मक विलीकरणात 573 रुग्ण उपचार घेत आहेत.