जिल्ह्यात पाच महिन्यात वाहतूक पोलिसांकडून दीड कोटींचा दंड वसूल

रत्नागिरी:- वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना जिल्हा वाहतूक पोलिसांनी चांगलाच दणका दिल्या आहे. जिल्ह्यात धडाकेबाज कारवाई करत गेल्या ५ महिन्यांत २३ हजार ३२९ प्रकरणे दाखल करण्यात आली. यातून १ कोटी ५६ लाख ५१ हजार २०० इतका दंड वसूल केला आहे. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेल्या कारवाईत ड्रंक ॲण्ड ड्राईव्हये केवळ एकच प्रकरण दाखल झाले आहे.

पुण्यामध्ये भरधाव मोटारीने दुचाकीवरील दोघांना उडवले गावामध्ये त्यांचा मृत्यू हल्याची घटना घडली होती. हा मोटारचालक दारूच्या नशेत असल्याचे प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात आले होते. यानंतर राज्यभरात दारू पिऊन गाडी चालवणा-यांविरुद्ध तसेच वाहतुकीच्या नियमांचे उल्लघंन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश राज्य शासनाच्यावतीने देण्यात आले आहेत. जिल्ह्याचा विचार करता वाहतूक पोलिसांकडूनही कठोर कारवाई करण्यासंबंधीची पावले उचलण्यात आली. १ जानेवारी ते ३१ मे २०२४ या दरम्यानच्या काळातील समोर आलेल्या आकडेवारीत मोठी दंडात्मक कारवाई झाल्याची माहिती समोर आली. त्यानुसार विनाहेल्मेटच्या ४१२ केसेस असून, २ लाख ६ हजार दंडाची कारवाई केली. वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याच्या ५ हजार ५१ केसेस असून, १६ लाख ७० हजार ५०० रुपयांच्या आर्थिक दंडाची कारवाई केली. वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याच्या ५ हजार ५१ केसेस केल्या, त्यामध्ये १६ लाख ७० हजाराचा दंड वसूल केला.

सिग्नल तोडल्याचे १५६ प्रकार समोर आले आहेत. फैन्सी नंबरप्लेटच्या ८६८ केसेस असून, ५ लाख २२ हजार ५०० रुपयांची दंडात्मक कारवाई केली तर विनापरवाना वाहन चालवल्याप्रकरणी ३५ जणांवर कारवाई केली असून, सुमारे १ लाखांचा दंड ठोठावण्यात आला. नो पार्किंगच्या २२, विना सीटमबेल्टच्या २ हजार ३००, काळ्या फिल्मच्या काचा लावणे, ट्रीपल सीट दुचाकी चालवणे आदीवर कारवाई करत गुन्हे दाखल केले आहेत.