रत्नागिरी:- जिल्ह्यात नव्याने 9 मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यापैकी 24 तासातील 5 तर यापूर्वीचे 4 मृत्यू आहेत. 24 तासात नव्याने 65 कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. नव्या 65 पॉझिटिव्ह रुग्णांमुळे रुग्णसंख्या 75 हजार 39 इतकी झाली आहे.
जिल्ह्यात 24 तासात 193 रुग्ण उपचाराअंती कोरोनामुक्त झाले असून आतापर्यँत 71 हजार 377 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण 95. 12 टक्के आहे.
नव्याने 9 मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृृृत 9 पैकी 24 तासातील 5 तर त्यापूर्वीचे 4 असे 9 मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 258 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्युदर 3.01 टक्के आहे. जिल्ह्यात गृह विलीगिकरणात 723 तर संस्थात्मक विलीकरणात 618 रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्ह्यात लक्षण नसलेले 1 हजार 43 तर लक्षण असलेले 298 असे एकूण 1 हजार 341 रुग्ण उपचार घेत आहेत.
मागील 24 तासात 3 हजार 442 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आता पर्यंत 6 लाख 33 हजार 590 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.