जिल्ह्यात नव्याने 82 कोरोना बाधित; एकूण रुग्णसंख्या 2148

रत्नागिरी:- जिल्ह्यात सातत्याने रुग्णसंख्या वाढत असताना आज मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. रात्री उशिरा प्राप्त अहवालात जिल्ह्यात आज तब्बल 82 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 2148 झाली आहे.

जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात आणि ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. नव्याने सापडलेल्या पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये रत्नागिरी 32, कामथे 17, कळंबणी 16, लांजा 5, गुहागर 7, देवरुख 1, अँटिजेन 4 येथील रुग्णांचा समावेश आहे.