जिल्ह्यात नव्याने 430 रुग्णांची नोंद; सातजणांचा मृत्यू 

रत्नागिरी:- आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात नव्याने 430 पीझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यात 24 तासात 344 तर त्यापूर्वीचे 86 रुग्ण आहेत. जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट 7.21 टक्के आहे. तर याच कालावधीत 7 जणांचा मृत्यू झाला आहे. 

मागील काही दिवस रुग्णसंख्या नियमितपणे 500 च्या दरम्यानच आहे. रविवारी आलेल्या अहवालात 4 हजार 771 चाचण्या करण्यात आल्या. यात यात आरटीपीसीआर चाचणी केलेले 192 तर अँटीजेन चाचणी केलेले 152 जण पॉझिटिव्ह सापडले आहेत. 24 तासात 6 हजार 283 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर याच कालावधीत 468 जण बरे होऊन घरी परतले आहेत. 

जिल्ह्यात 24 तासात 7 जणांचा मृत्यू झाला आहे. यात 24 तासातील 3 तर त्यापूर्वीचे 4 अशा 7 जणांचा समावेश आहे. सात मृत्यूमध्ये रत्नागिरी तालुक्यात 2, दापोली 2, संगमेश्वर 1 आणि चिपळूण तालुक्यात 2 मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 7 जणांच्या मृत्यूंमुळे जिल्ह्याचा मृत्युदर 2.84 टक्क्यांवर पोहचला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1 हजार 817 मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.