रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोनाचा धुमाकूळ सुरूच असून मागील 24 तासात जिल्ह्यात कोरोनाचे तब्बल 51 नवे रुग्ण सापडून आले आहेत. यात आरटीपीसीआर टेस्ट केलेले 21 तर अँटिजेन टेस्ट केलेले तब्बल 30 रुग्ण सापडून आले आहेत. यामुळे जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 4 हजार नजीक पोचली आहे. तर तीन जणांचा मृत्यू झाला असून मृत्यूसंख्या 135 झाली आहे.
नव्याने सापडलेल्या 51 रुग्णांमध्ये सर्वाधिक 30 रुग्ण हे अँटिजेन टेस्ट केलेल्या रुग्णांचे आहेत. यामध्ये रत्नागिरीतील 12 रुग्ण, दापोलीतील 13, लांजा 2 आणि खेड येथील तब्बल 3 रुग्णांचा समावेश आहे. तर आरटीपीसीआर टेस्ट केलेल्या रुग्णांमध्ये रत्नागितील 9, चिपळूण 9, संगमेश्वर 3 रुग्णांचा समावेश आहे.
मागील 24 तासात जिल्ह्यात 3 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. यात संगमेश्वर 1, लांजा 1 आणि राजापूर तालुक्यात 1 मृत्यू झाला आहे. आजपर्यंत एकूण 135 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असून यात सर्वाधिक मृत्यू रत्नागिरीत 43 झाले आहेत. खेडमध्ये15, गुहागर 4, दापोली 21, चिपळूण 29, संगमेश्वर 10, लांजा 2, राजापूर 7 आणि मंडणगडमध्ये 1 मृत्यू झाला आहे.