रत्नागिरी:- मागील चोवीस तासात जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णसंख्यने उच्चांक गाठला. एका दिवसात तब्बल 142 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यामुळे जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्येने 4 हजार 199 चा टप्पा गाठला आहे. तर मागील चोवीस तासात दोन रुग्णांचे मृत्यू झाले असून जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या वाढून 139 वर पोचली आहे.
जिल्ह्यात कोरोना बधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. मंगळवारी जिल्ह्यात 125 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले होते. बुधवारी तब्बल 142 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. 24 तासात सर्वाधिक रुग्ण बुधवारी सापडून आले असून जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा 4 हजार 199 इतका झाला आहे.
नव्याने आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आरटीपीसीआर टेस्ट केलेले 66 तर अँटिजेन टेस्ट केलेले 76 असे एकूण 142 नवे रुग्ण सापडले आहेत. यात आरटीपीसीआर टेस्ट केलेल्या रुग्णांमध्ये मंडणगड तालुक्यात 1, गुहागर 11, चिपळूण 15, संगमेश्वर 10, रत्नागिरीत सर्वाधिक 23, लांजा 4 आणि राजापूर तालुक्यात 3 रुग्ण सापडले आहेत. तर अँटिजेन टेस्ट केलेल्यांमध्ये मंडणगड तालुक्यात 1, दापोली 11, खेड 7, गुहागर 15, चिपळूण 34, संगमेश्वर 10, रत्नागिरीत 17, लांजा 22 आणि राजापूर तालुक्यात 2 रुग्ण सापडले आहेत.
दरम्यान जिल्ह्यात उपचारा दरम्यान 2 रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये दापोली तालुक्यातील एकाचा तसेच चिपळूण तालुक्यातील एका रुग्णाचा उपचारादरम्याने मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या 139 झाली आहे.