जिल्ह्यात गेल्या 24 तासात तब्बल 134 कोरोनाबाधित

रत्नागिरी:- नव्याने आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. 24 तासात 1 हजार 674 अहवालांमध्ये तब्बल 134 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. 24 तासात एका रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असून जिल्ह्यात सद्यस्थितीत 431 पॉझिटिव्ह रुग्ण उपचारखाली आहेत. 

जिल्ह्यात 24 तासात 33 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यँत 76 हजार 754 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण  96.31 टक्के आहे. नव्याने 134 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने एकूण बाधित रुग्णसंख्या 79 हजार 692 इतकी झाली आहे. 

 जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 492 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्युदर 3.1 टक्के आहे. जिल्ह्यात गृह विलीगिकरणात 321 तर संस्थात्मक विलीगिकरणात 110 रुग्ण उपचार घेत आहेत.