रत्नागिरी:- बंगालच्या उपसागरातील वादळी प्रणालीच्या प्रभावामुळे पावसाला पोषक हवामान होत आहे. यातच शनिवारी किमान तापमानात अचानक मोठी घट झाली. गुरूवारपर्यंत पाऊस स्थिती कायम राहणार आहे. या कालावधीत दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वतविला आहे. त्यामुळे अपेक्षित गारठा न पडल्याने आणि मळभी स्थिती कायम आहे. त्यामुळे बागायती बेगमीतील अडचणीत वाढ झाली आहे.
बंगालच्या उपसागरात गुरुवारपासून मंदूस चक्रीवादळाची निर्मिती झाली. पूर्व किनार्याकडे झेपावत असलेली वादळी प्रणाली शुक्रवारी सकाळपर्यंत पूर्व किनार्यावरील पदुच्चेरी, श्रीहरिकोटा ते महाबलीपूरम दरम्यान किनार्याला धडकल्याने निर्माण झालेल्या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे कोकणात पावसाची शक्यता आहे. या शक्यत्येने गारठा गायब झाला असून तापमानातही किंचित वाढ होण्याची अटकळ आहे. त्यामुळे अपेक्षित गारठा न पडल्याने आणि मळभी स्थिती कायम आहे. त्यामुळे आंबा हंगामाच्या बेगमीतील पहिल्याच टप्प्यात बागायतदरांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
पावसाच्या शक्यतेने बागायतदारांपुढे फवारण्यांची सत्रे घेण्यात अडचणी येणार आहेत. सध्या केवळ पालवी येत असून मोहोर टिकविण्याची कसरत बागायतरादांना करावी लागत आहेे. वातावरणातील बदलाने मोहेराचे रुपांतर फळात होण्यासाठी प्रतिकुल हवामानाचा सामना आता करावा लागत आहे, असे टिके येथील बागायतदार संजय पवार आणि संतोष घाडी यांनी सांगितले.